क्राईमगोंदियामहाराष्ट्र

ऑनलाइन सायबर फसवणुकीसाठी बँक खाते वापरल्याप्रकरणी चिचगड पोलिसांत गुन्हा दाखल

चिचगड, ता. देवरी 17 जुलै : ऑनलाइन सायबर फसवणुकीसाठी स्वतःचे बँक खाते वापरण्यास परवानगी दिल्याप्रकरणी चिचगड पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार सुधाकर पांडुरंग शहारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश जग्गुराम धरमगुडे (वय अंदाजे ४५ वर्षे, रा. ककोडी, ता. देवरी, जि. गोंदिया) याच्याविरुद्ध गुन्हा क्र. २०१/२०२५ नोंद करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ६१(२) व ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या नावावरील आयडीबीआय बँकेचे खाते सायबर फसवणुकीत वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले. या खात्यामार्फत तक्रारदार लेनी बी. डीसूजा यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यातून ₹44,361/- रक्कम फसवणुकीने आरोपीच्या खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही घटना ३१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान घडल्याचे नमूद करण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

चिचगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) हेगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेगडकर हे या गुन्ह्याचे तपास अधिकारी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button