गोंदियामहाराष्ट्रव्यवसाय

खैरबोडीत श्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक* *राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्याच्या शेतात मार्गदर्शन*

गोंदिया, दि.15 ( निलेश शहारे ) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेअंतर्गत तिरोडा तालुक्यातील मौजा खैरबोडी येथे आज श्री पद्धतीवर आधारित भात पीक लागवडीचे प्रात्यक्षिक मोठ्या उत्साहात पार पडले.

तिरोडा तालुक्यातील खैरबोडी येथील शेतकरी युवराज हिरामण टेंभरे यांच्या शेतावर घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकात श्री पद्धतीने भात रोपांची लागवड करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी तिरोडा पवन मेश्राम, उप कृषी अधिकारी तिरोडा बाबासाहेब शिंदे, खैरबोडीचे उपसरपंच महेश ठाकरे व सहाय्यक कृषी अधिकारी जी. एन. आबाळे उपस्थित होते.

श्री पद्धतीमुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा 50% कमी बियाणे, 40% कमी पाणी आणि 30% पर्यंत जास्त उत्पादन मिळते, असे मार्गदर्शन यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी केले. तसेच कमी मजुरी, कमी खत आणि कमी किड-रोगाचा प्रादुर्भाव यामुळे खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो असे सांगण्यात आले.

कार्यक्रमात एकात्मिक किड व्यवस्थापन, संतुलित खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. गावातील अनेक शेतकरी या प्रात्यक्षिकाला उपस्थित होते आणि त्यांनी श्री पद्धतीबद्दल उत्सुकता दाखवली.

कृषी विभागातर्फे अशाप्रकारचे प्रात्यक्षिक तालुक्यातील इतर गावांमध्येही राबविण्यात येणार असल्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी पवन मेश्राम यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button