गुन्हेगारीगोंदियासडक अर्जुनी

गोंदिया जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; ५.८६६ किलो गांजा जप्त, महिला आरोपी अटकेत

गोंदिया २७ जुलै ( निलेश शहारे ) : गोंदिया जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा (सौंदड) येथे एका महिलेच्या घरावर छापा टाकून तब्बल ५ किलो ८६६ ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत ₹५ लाख ८६ हजार ६०० इतकी असून, या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध अमली पदार्थांच्या व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.

पोलिस अधीक्षक गौरव भामरे व अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवत असताना, २६ जुलै २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिता अशोक मोहनकर (वय ५३), रा. फुटाळा, सौंदड, ता. सडक अर्जुनी ही महिला घरातून गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान घरातील कोपऱ्यात ठेवलेल्या प्लास्टिकच्या पोत्यामध्ये हिरव्या रंगाचा ओलसर गांजा, पाने, फुले व बिया असा एकूण ५.८६६ किलो गांजा आढळून आला.

पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून, तिच्याविरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिषेक जंगमवार, पो.हवा. तुलसीदास लुटे, पो.हवा. प्रकाश गायधने, पो.हवा. दुर्गेश तिवारी, पोशि सुनील डाहाके, पोशि राकेश इंदुरकर आणि चापोशि विलास ठाकरे यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button