गोंदियासडक अर्जुनीसामाजिक

जनतेच्या दारी प्रशासन; गोंदिया व सडक अर्जुनीत महसूल जनकल्याण शिबिर

गोंदिया, दि. 31 जुलै ( निलेश शहारे ) : नागरिकांच्या प्रलंबित महसुली कामांचा तात्काळ निपटारा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी महसूल व वन विभागाच्या पुढाकारातून राज्यभर 22 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत “महसूल जनकल्याण शिबिर” राबविण्यात येत असून शनिवारी गोंदियात आणि रविवारी सडक अर्जुनी येथे आयोजित होणार आहेत.

शिबिरांपूर्वी लाभार्थ्यांची पूर्व तपासणी, पात्रता पडताळणी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे सुरू असून “एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये,” यासाठीचे प्रयत्न केले जाते आहेत.

गोंदिया येथील जलाराम लॉन्स येथे शनिवारी दिनांक 01 ऑगस्ट रोजी होणार आहे. तर रविवारी 02 तारखेला सडक अर्जुनी येथे आशीर्वाद लॉन येथे हे शिबिर पार पडणार आहे.

राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत आयोजित या शिबिरांमुळे महसूल विभागाच्या सेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत. यामध्ये महसूल विषयक सेवा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, आयुष्मान भारत योजना, वनपट्टे व जमीन पट्टे वाटप अशा महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ थेट गरजू नागरिकांना दिला जाणार आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांपासून मुक्त करून “सेवा तुमच्या दारी” या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करणे होय. प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या गरजेनुसार नियोजन करून, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध विभागांच्या समन्वयातून ही शिबिरे यशस्वीपणे पार पडणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button