गोंदियासडक अर्जुनी

विषारी औषध प्राशनानंतर 23 वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू; डूग्गीपार पोलिसांकडून चौकशी सुरू

गोंदिया 7 जुलै 2026 ( निलेश शहारे) : गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील ब्राह्मणी येथील 23 वर्षीय तरुणीचा विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या प्रकरणी दुग्गीपार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

मृत तरुणीचे नाव आरती पुष्पसिंह ठाकूर (वय 23, रा. ब्राह्मणी, ता. सडक-अर्जुनी, जि. गोंदिया) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरती यांनी 2 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने सेंट्रल हॉस्पिटल, गोंदिया येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचार सुरू असताना 4 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 8.10 वाजता त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) 2023 च्या कलम 194 अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खोटेले यांच्या मार्गदर्शनाखाली डूग्गीपार पोलीस ठाणे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button