महाराष्ट्रवृत्तविशेष

आरटीओ कर्मचारी आजपासून संपावर; पदोन्नतीसह सेवा प्रवेशासंदर्भातील मागण्यांकडे सरकारच्या दुर्लक्षाचे आरोप

नागपूर 16 जून ( निलेश शहारे) : आरटीओ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या परिवहन विभागाचे कर्मचारी आजपासून (16 जूनपासून) बेमुदत संपावर जाणार आहेत. या प्रकारामुळे वाहन परवान्यासह नागरिकांची कामे रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

सेवाप्रवेश नियमाच्या अनुपलब्धतेचे कारण देऊन कर्मचाऱ्यांना पदोन्नती देता येणार नाही, असे धोरण ठेवल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठेचे नुकसान झाले आहे. यासाठी संघटनेने आक्षेप घेऊन वारंवार निवेदने दिली. या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त कार्यालयाने लवकरात लवकर सेवाप्रवेश नियम व पदोन्नतीवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप मागण्या पूर्ण न झाल्याने आजपासून (दि. 16) संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्मचाऱ्यांच्या या आहेत प्रलंबित मागण्या

1. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी या 23 पदांचे पदोन्नती मिळावी 2. कार्यालय अधीक्षक पदांचे सेवाप्रवेशावर निर्णय घ्यावा. 3. सहाय्यक मोटार वाहन अभियोक्ता सदर पदांचे सेवानियम प्रवेश नसल्याने विभागातील विधी पदवीधारक सदर पदांवर नियुक्ती पासून वंचित आहेत. 4. वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे सेवाप्रवेश नियम तयार करण्यात यावे. 5. पदनाम बदल लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक या पदांचे अनुक्रमे परिवहन सहाय्यक व वरिष्ठ परिवहन सहाय्यक पदनाम बदल करण्यात यावे. 6. आश्वासित प्रगती योजना वरिष्ठ लिपिक व कार्यालय अधीक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अद्याप दिलेले नाहीत. याबाबत तत्कालीन परिवहन आयुक्त यांनी पंधरा दिवसात कार्यवाही करू असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु पुढे काहीच झाले नाही.

कर्मचाऱ्यांचे आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठेचे नुकसान झाले आहे. यासाठी संघटनेने आक्षेप घेऊन वारंवार निवेदने दिली. या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त कार्यालयाने लवकरात लवकर सेवाप्रवेश नियम व पदोन्नतीवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप मागण्या पूर्ण न झाल्याने मंगळवारी (दि. 16) पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button