गोंदियामहाराष्ट्रसामाजिक

जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या पुढाकारातून ५२ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन

चान्ना–पिंपळगाव/खांबी परिसरात भुमीपुजन सोहळा संपन्न

गोंदिया, २१एप्रिल २०२६चान्ना/बाक्टी : जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या निधीतून व पुढाकारातून चान्ना व पिंपळगाव/खांबी परिसरातील विविध विकासकामांचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या भेंडारकर यांच्या प्रयत्नांतून एकूण ५२ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

पिंपळगाव/खांबी येथे १२ लाख रुपयांची अंगणवाडी इमारत, १० लाख रुपयांचा सिमेंट रस्ता तसेच दलित वस्ती अंतर्गत ५ लाख रुपयांचा सिमेंट रस्ता अशा एकूण २७ लाख रुपयांच्या कामांना प्रारंभ झाला.

तसेच चान्ना/बाक्टी परिसरात सिमेंट रस्ते बांधकाम, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकडे जाणारा पोच मार्ग, तसेच दलित वस्तीतील सिमेंट रस्ते अशा विविध कामांचे २५ लाख रुपयांचे भूमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पूजाविधीने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून कामांना अधिकृत प्रारंभ देण्यात आला. या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून, विशेषतः वाहतूक व्यवस्था व दैनंदिन जीवन अधिक सुलभ होणार आहे.

यावेळी बोलताना जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. “गावोगावी रस्ते, अंगणवाडी व आरोग्य सुविधा सक्षम झाल्या तरच खरा विकास साध्य होईल,” असे ते म्हणाले. विशेषतः दलित वस्तीतील रस्त्यांच्या कामांमुळे तेथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या सोहळ्याला पंचायत समिती उपसभापती संदीप कापगते, पंचायत समिती सदस्य कुंदा लोगडे, चान्ना सरपंच सचिन डोंगरे, पिंपळगाव सरपंच विलास फुंडे, चान्ना उपसरपंच मोरेश्वर सोनवाणे, पिंपळगाव उपसरपंच निवृत्ता शेंडे, वि.से. सहकारी संस्थेचे अध्यक्ष अरुण गजापुरे, भागवत लंजे, पत्रकार विनायक राखडे, मरसकोल्हेताई, ग्रामविकास अधिकारी सचिन कुथे, आर. ए. मेश्राम, मनोज कोरे, गौरीशंकर ब्राह्मणकर, आशिष बिसेन, जीजराम शेंडे, वसंत ब्राह्मणकर, संतोष मेश्राम, महादेव ब्राह्मणकर, खुशाल तवाडे, दिलीप ब्राह्मणकर, अनिकेत डोंगरे, महेंद्र नेवारे, वसुंधरा चौरे (पो.पा.), माधुरी ब्राह्मणकर, मोक्षलता ब्राह्मणकर, आम्रपाली चौरे, निग्रोकांता डोंगरे, धम्मक्रांती तुरकर, पिंगला फुंडे, अनमोल शेंडे, भूमेश्वरी मेंढे, रीना ब्राह्मणकर तसेच गावातील इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button