सडक अर्जुनी येथे राजरत्न आंबेडकर यांची सभा 27 रोजी.

सडक अर्जुनी.२६एप्रिल २०२६ ( निलेशकुमार शहारे )
एक पाऊल उन्नतीकडे हा महामंत्र घेऊन, बौद्धांची आर्थिक व्यवस्था सक्षम करण्याच्या महत्त्वपूर्ण हेतूने, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष. आयुष्यमान डॉ. राजरत्न अशोक आंबेडकर यांची सभा दिनांक 27 एप्रिल 2026 रोज सोमवारला एक्वा एडवेंचर फॅमिली वॉटर पार्क अँड रिसॉर्ट नैनपुर डुग्गीपार . सडक अर्जुनी जवळ दुपारी 12 वाजता होणार आहे.
सकाळी 10 वाजता संबोधी बौद्ध विहार सडक अर्जुनी येथून राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थित रॅली निघणार असून, सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत भीम गीतांचा कार्यक्रम .आणि 12 वाजता राजरत्न आंबेडकर यांची सभा होईल, यावेळी सभेचे उद्घघाटन इंजिनिअर सुशांत साखरे यांचे हस्ते होईल. तर स्वागत अध्यक्ष म्हणून डॉ. अजय लांजेवार उपस्थित असेल तसेच वसंत लांजेवार वसंत गहाणे पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय महासचिव दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राहुल शेंडे. राज्याध्यक्ष बुद्धाजी वाढविंदे. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर सहकारी पतसंस्थेचे राज्य अध्यक्ष रवींद्र गुरचल. विभागीय अध्यक्ष विजय बनसोड. तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल .कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे तालुका अध्यक्ष रामलाल शहारे यांनी केले आहे.



