“लाडक्या बहिणींना अखेरची संधी” या मथळ्याखाली प्रसिध्द झालेली बातमी निराधार

गोंदिया, दि.22 :* “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या मुदतीत योग्य ती कागदपत्र सादर करु न शकलेल्या लाडक्या बहिणींना जिल्हयांच्या महिला व बालविकास विभागात कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. अशी बातमी “लाडक्या बहिणींना अखेरची संधी” या मथळाखाली ZEE २४ तास या News Channal व लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिध्द झाली आहे.
याबाबत स्पष्ट करण्यात येते की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्हयांच्या महिला व बालविकास विभागात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत.
तथापि, “लाडक्या बहिणींना अखेरची संधी” या मथळ्याखाली ZEE २४ तास या वृत्त वाहिनीने https://www.instagram.com/reel/DYbWXZGH-RK/?igsh=cmVxNGJ२७.३czeWgz या लिंकवर बातमी प्रसिध्द करण्यापूर्वी त्याबाबतची खात्री/शाहनिशा न करता (Unverified) प्रसिध्द करण्यात आली आहे.
तसेच लोकसत्ता या वृत्तपत्रात देखील “लाडक्या बहिर्णीना अखेरची संधी” या मथळ्याखाली वृत्तपत्र प्रसिध्द करण्यात आले आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्हयांच्या महिला व बालविकास विभागात कागदपत्रे सादर करण्याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही.
तथापि, वृत्त वाहिनी व वृत्तपत्र माध्यमातून सदर बातमी Social Media व्दारे प्रसिध्द होत आहे. त्यामुळे योजनेचा लाभार्थी महिलांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण होत असून यामुळे महिलांचा जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात जमाव होत आहे.
सदर वस्तुस्थिती लक्षात घेता, अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवण्यात येवू नये, असे आवाहन राज्यातील नागरिकांना शासनस्तरावरुन करण्यात आले आहे.




