गोंदियामहाराष्ट्रसामाजिक

गोठणगाव तिबेटियन कॅम्पच्या समस्यांवर प्रशासनाशी चर्चा

गोंदिया, दि.28 : गोंदिया जिल्ह्यात असणाऱ्या गोठणगाव येथील तिबेटियन कॅम्पचे तेनझिन त्सांगपा, सेटलमेंट अधिकारी, नॉर्ग्येलिंग तिबेटन सेटलमेंट, लोबसांग धोन्ल्यो, अध्यक्ष, स्थानिक तिबेटन कॅम्प, मिगमार छोडोन, कार्यालयीन सचिव, तिबेटन सेटलमेंट यांनी बुधवारी अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांची भेट घेतली.

यावेळी तिबेटियन प्रतिधिनींनी बौद्धांचे तैलचित्र भेट दिले. त्यांनी गोठणगाव येथे असलेल्या तिबेटियन कॅम्पची सविस्तर माहिती दिली. सदर कॅम्प हा भारत सरकारच्या वतीने १९७२ साली वसविण्यात आला असून महाराष्ट्रातील हा एकमेव तिबेटियन कॅम्प आहे, असे त्यांनी सांगितले. बैठकीदरम्यान कॅम्पमधील विविध स्थानिक समस्यांवर चर्चा करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button