गोंदियासडक अर्जुनीसामाजिक

सडक अर्जुनीत परमात्मा एक सेवकांचा कोजागिरी उत्सव उत्साहात संपन्न!

महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या तत्व, शब्द व नियमांवर मार्गदर्शकांचे मार्गदर्शन; भजन-गायनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली

सडक अर्जुनी, दि. १ नोव्हेंबर २०२६ (प्रतिनिधी) : महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशानुसार सडक अर्जुनी येथील परमात्मा एक सेवकांच्या वतीने कोजागिरी कार्यक्रमाचे आयोजन लहरी नगर येथील पटांगणात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील परमात्मा एक सेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथरी येथील मार्गदर्शक श्री. गोरेलालजी कुसराम होते. यावेळी डव्वा येथील मार्गदर्शक श्री. सालिंदरजी कापगते, चिखली येथील मार्गदर्शक श्रीपत थेर, परसोडी येथील रामकृष्ण मेंढे, सडक अर्जुनी येथील मार्गदर्शक कुंभराजजी लांजेवार, परसोडी येथील मार्गदर्शक मुरलीधर भांडारकर, सौ.वंदना डोंगरवार उपाध्यक्ष नगर पंचायत, सौ. दिक्षा भगत नगरसेविका, महेंद्र वंजारी, श्री आनंद जी अग्रवाल नगरसेवक सडक अर्जुनी कोदामेडी येथील धानीराम खोब्रागडे तसेच श्री. आशिषजी येरणे यांनी संचालनाचे कार्य केले.

यावेळी महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दिलेल्या तत्व, शब्द व नियमांचे महत्त्व विशद करण्यात आले. मानवी जीवनात सदाचार, शिस्त, निष्ठा आणि महान त्यागी बाबा जुमदेव जी च्या विचारांचे पालन करून जीवन जगण्याचा संदेश मार्गदर्शकांनी आपल्या विचारांतून दिला.

या कार्यक्रमाला नागपूर मंडळाचे संचालक श्री. महेंद्रसिंग गुरबेले यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमादरम्यान सेवकांना आध्यात्मिक विचारांची प्रेरणा मिळाली. चर्चासत्र व विचारविनिमयानंतर सायंकाळच्या सामूहिक प्रार्थनेने बैठकीचा समारोप करण्यात आला.

यानंतर मालुटोला येथील परमात्मा एक ऑर्केस्ट्रा गायन ग्रुपने सादर केलेल्या भक्तिगीतांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कोजागिरी कार्यक्रमाबद्दल उपस्थित सेवकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशांत सिडाम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button