ताज्या बातम्याराजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छा; बालेन शाह कोण आहेत? त्यांचा संपूर्ण प्रवास जाणून घ्या

रॅपर ते राजकारणी असा प्रवास केलेल्या बालेन शाह यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे.

गेल्या वर्षी तरुणांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाल्यानंतर नेपाळमध्ये झालेल्या या निवडणुकीत बालेन शाह यांना मोठा विजय मिळाला होता.

बालेन शाह (35 वर्षे) यांचा राजकारणातील उदय हा नेपाळच्या राजकारणातील एका महत्त्वाच्या बदलाचं चिन्ह आहे.

नेपाळमधील जे मतदार, भ्रष्टाचार, नेपोटिझम किंवा घराणेशाही आणि प्रभावशाली लोकांच्या सरकारवर नाराज होते, अशांना

निवडणुकीच्या काळात त्यांनी दिलेली आश्वासन आवडली होती.

शुक्रवारी (27 मार्च) पदभार स्वीकारण्याआधी बालेन शाह यांनी नेपाळच्या भविष्याबाबत एक आशावादी गाण प्रदर्शित केलं. लोक त्यांना ‘बालेन’ म्हणून ओळखतात.

हे गाणी रीलीज होताच काही तासांमध्येच ते 20 लाखांहून अधिकवेळा पाहिलं गेलं.

हे गाणं त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण करून देतं. ज्या काळात ते ‘अंडग्राऊंड रॅप’ च्या दुनियेत सक्रिय होते आणि संगीताच्या माध्यमातून नेपाळमधील भ्रष्टाचार आणि इतर सामाजिक समस्यांविरुद्ध आवाज उठवत असत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button