दिक्षा जनबंधूं हिची जि. प. कोल्हापूरच्या शाळेत शिक्षिका म्हणून निवड
आ. बडोले यांच्या हस्ते सत्कार; ग्रामीण विद्यार्थिनीच्या जिद्दीला यशाची नवी झेप

सडक अर्जुनी दि. २ऑगस्ट २६ : सरळ सेवा भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झालेल्या शिक्षक भरतीमध्ये सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा येथील दिक्षा ज्ञानेश्वर जनबंधू यांची कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत शाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणून निवड झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दिपाली यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर अनेकदा विविध अडचणी उभ्या राहतात. मात्र, या अडचणींना न जुमानता मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर आपले ध्येय साध्य करता येते, हे दिक्षा जनबंधू यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे.
दिक्षा यांनी शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी सातत्याने अभ्यास केला. योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत त्यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह कोहमारा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
दिक्षा जनबंधू यांची शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार बडोले यांच्या हस्ते दिपाली यांना शाल, पुष्पगुच्छ व बुद्धमूर्ती प्रदान करून त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले.
जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाचा विजय

ग्रामीण भागातून येऊन शिक्षकपदापर्यंत मजल मारणाऱ्या दिपाली यांच्या यशामागे त्यांची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाची मोठी भूमिका आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी योग्य मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळविता येते, यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ. शारदा ताई बडोले, जि.प. सदस्या कविता रंगारी, कोहमारा गावचे सरपंचा प्रतिभा भेंडारकर, सावित्रीबाई फुले बँकेचे मॅनेजर धनराज नागापुरे, दिपालीचे आई वडील व इतर नागरिक उपस्थित होते.
दिक्षा जनबंधू यांच्या या यशामुळे कोहमारा परिसरातील विद्यार्थी आणि युवक-युवतींमध्येही नव्या प्रेरणेची भावना निर्माण झाली असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
— अस्तित्वाचे बोल





