गोंदियामहाराष्ट्रवृत्तविशेष
जिल्ह्यातील 5,169 शेतकऱ्यांच्या खात्यात 30 कोटींहून अधिक कर्जमाफीची रक्कम जमा

गोंदिया, दि.25 ऑगस्ट 26 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील 5,169 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 30 कोटी 30 लाख 38 हजार रुपयांहून अधिक कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे.
राज्यभरात या टप्प्यात 6 लाख 36 हजार 36 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी 30 लाख 62 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली असून, त्यामध्ये जिल्ह्यातील 5,169 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 4355 शेतकऱ्यांच्या खात्यात 24 कोटी 59 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थी हे विविध राष्ट्रीयकृत बँकांचे खातेदार आहेत.
कर्जमाफीची रक्कम थेट खात्यात जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, शासनाच्या या निर्णयाबद्दल लाभार्थी शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.





