गोंदियावृत्तविशेषसडक अर्जुनी

गट्टूच्या कामात चोरीच्या रेतीच्या वापराचा आरोप; नगर पंचायत प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष!

सडक अर्जुनी 3 ऑक्टोबर 26 ( निलेश शहारे ) : सडक अर्जुनी नगर पंचायत हद्दीत सुरू असलेल्या वॉर्ड क्रमांक 7 मध्ये बाजारवाडी परिसरात गट्टू (पेव्हिंग ब्लॉक) कामात नियमबाह्य पद्धतीने रेतीचा वापर होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. सदर रेती चोरीची असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याबाबत संबंधित विभागाने तपास करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

नगर पंचायत हद्दीत विविध ठिकाणी गट्टू बसविण्याची कामे सुरू आहेत. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः कामाच्या ठिकाणी वापरली जात असलेली रेती अधिकृत परवानगीने आणण्यात आली आहे का, तिचा वाहतूक परवाना व इतर आवश्यक कागदपत्रे आहेत का, याची तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या आरोपानुसार, संबंधित कामात वापरली जाणारी रेती चोरीची असण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे तपास किंवा कारवाई झालेली नसल्याने आरोपांची सत्यता संबंधित विभागाच्या चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

गट्टूचे काम कोणत्या निधीतून, कोणत्या ठेकेदारामार्फत आणि कोणत्या अंदाजपत्रकानुसार सुरू आहे, तसेच बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या रेतीसह अन्य साहित्याची गुणवत्ता व वैधता याची नगर पंचायत प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

चोरीच्या रेतीचा वापर झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई होणार का आणि आतापर्यंत प्रशासनाने कोणती पावले उचलली आहेत, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button