राजर्षी शाहू महाराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात

सडक अर्जुनी, दि. २६ सप्टेंबर : राजर्षी शाहू महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, सडक अर्जुनी येथे शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन तसेच नॅशनल फार्मसी सप्ताह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी क्विझ कॉम्पिटिशन, रील मेकिंग कॉम्पिटिशन यांसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना फार्मसीचे महत्त्व, फार्मासिस्टची भूमिका आणि आरोग्य व्यवस्थेतील फार्मासिस्टचे योगदान याबाबत माहिती देण्यात आली.

यानंतर विद्यार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय, सडक अर्जुनी येथे भेट देऊन आरोग्य व्यवस्थेतील फार्मासिस्टच्या महत्त्वाबाबत जनजागृती केली. रुग्णालयातील आयपीडी रुग्णांची भेट घेऊन त्यांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढून फार्मसी व फार्मासिस्टच्या भूमिकेबाबत जनजागृती केली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य अक्षयकुमार मेश्राम यांच्यासह प्रा. चेतन कुर्वे, प्रा. शुभम परिहार, प्रा. प्रशांत येरने, प्रा. पूनम हेमने, प्रा. मंजुषा मेश्राम तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





