गोंदियामहाराष्ट्रवृत्तविशेष

अभिजित घोरपडे यांची गोंदिया येथे नियुक्ती

अपर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती

गोंदिया, प्रतिनिधी दि.25 : अभिजित घोरपडे हे गोंदिया येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. यापूर्वी ते राज्य वातावरणीय कृती कक्ष, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, मुंबई येथे संचालक म्हणून कार्यरत होते. महसूल व वन विभागाच्या दिनांक 15 मे 2026 रोजीच्या शासन आदेशानुसार अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री. घोरपडे यांनी नुकतेच गोंदिया येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला असून त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाला अधिक बळ मिळणार आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा लाभ जिल्ह्याच्या विकासकामांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button