गोंदियासामाजिक

बाबासाहेबांचे विचार जगाला दिशा देणारे: आमदार राजकुमार बडोले

बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन

डव्वा (ता. सडक अर्जुनी), दि. १३ एप्रिल :

प्रज्ञा बुद्ध विहार समिती, डव्वा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य भीमगीत नृत्य स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला आमदार राजकुमार बडोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या प्रसंगी पं.स. सभापती चेतन वडगाये, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गंगाधर परशुरामकर, पं.स. सदस्य शालिंदर कापगते, आनंद चंद्रिकापुरे , जि.प. सदस्य शैलेश नंदेश्वर, अभिनेत्री कु. क्वीनल मुनेश्वर, माजी सरपंच पुष्पमाला बडोले, माजी सरपंच दिनेश कोरे , सरपंच योगेश्वरी चौधरी, सरपंच हशीना जांभुळकर, , खेमलता राऊत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश बडोले, उपसरपंच हंसराज राऊत, राकेश जैन, एकनाथ गायधने, दिलेश्वरी कुरसुंगे, संगीता घासले, विजय गावराने, मंगला कुरसुंगे तसेच इतर मान्यवर, समाजबांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार राजकुमार बडोले बोलले की, संविधानामुळेच सामान्य माणूस लोकशाहीचा राजा बनतो. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात करून समाजाने पुढे जाण्याची गरज आहे. अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण हे केवळ सांख्यिकी व वस्तुनिष्ठ आकडेवारीच्या आधारेच झाले पाहिजे. ठोस व विश्वसनीय डेटा उपलब्ध झाल्यानंतरच कोणतेही उपवर्गीकरण करण्यात यावे असे त्यांनी स्पष्ट मत व्यक्त करत उपवर्गीकरणाच्या सध्याच्या प्रक्रियेवर विरोध दर्शविला.

पुढे ते म्हणाले की, बाबासाहेबांचे विचार केवळ भारतापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्या उच्च शिक्षणामुळे भारताचे नाव जागतिक स्तरावर उंचावले गेले आहे. आपण त्यांचा आदर्श ठेवून त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी त्यांना अभिवादन करण्याची पद्धत आहे असेही आमदार बडोले यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button